डॅडीचा जावई आहे हा मराठी अभिनेता! अरुण गवळीच्या मुलीशी केलंय लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 17:50 IST2025-09-07T17:43:29+5:302025-09-07T17:50:07+5:30

अरुण गवळीला गीता आणि योगिता या दोन मुली आहेत. पण, डॅडीचा जावई कोण आहे हे तुम्हाला माहितीये का?

कुख्यात गँगस्टर आणि डॅडी नावाने प्रसिद्ध असलेला एकेकाळचा मुंबईतील डॉन अरुण गवळी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर १७ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आला.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात २०१२ मध्ये न्यायालयाने डॅडीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरुण गवळीचं दगडी चाळीत जंगी स्वागत करण्यात आलं.

अरुण गवळीला गीता आणि योगिता या दोन मुली आहेत. पण, डॅडीचा जावई कोण आहे हे तुम्हाला माहितीये का?

डॅडीची लेक योगिताने एका मराठी अभिनेत्याशी लग्न केलं आहे. कुख्यात गँगस्टर असलेल्या डॅडीचा जावई एक मराठमोळा अभिनेता आहे.

योगिताने २०२० मध्ये अभिनेता अक्षय वाघमारेशी लग्न करत संसार थाटला. त्याआधी ५ वर्ष ते एकमेकांना ओळखत होते. त्यांना एक मुलगीही आहे.

अक्षय वाघमारे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. अनेका मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे.

'ती फुलराणी', 'ज्ञानेश्वर माऊली', 'प्रतिशोध : झुंज अस्तित्वाची' या मालिकांमध्ये तो दिसला होता.

तर 'बसस्टॉप', 'बेधडक', 'युथ', 'दोस्तीगिरी', 'द स्ट्रग्सल्स' अशा सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे.

दिग्पाल लांजेकरांच्या 'पावनखिंड', 'फत्तेशिकस्त', 'शेर शिवराज' या सिनेमांत त्याने ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत.

अक्षयची पत्नी आणि डॅडीची मुलगी योगितादेखील एक निर्माती आहे. तिने निर्मिती केलेल्या 'खुर्ची' सिनेमात अक्षय मुख्य भूमिकेत होता.

योगिता गवळी राजकारणातही सक्रिय आहे. अनेकदा ती अक्षय आणि कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर करत असते.