Majhi Tujhi Reshimgath : मालिकेचा शेवट झाला गोड अन् कलाकारांनी केली जंगी पार्टी, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 10:09 AM2023-01-23T10:09:31+5:302023-01-23T10:28:46+5:30

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेनं गेली दीड वर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेने सर्वांचे मनोरंजन केले. यातील छोट्या परीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर यश आणि नेहाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.

मालिकेचा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आला असून ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेच्या स्टारकास्टने नुकतेच पार्टीचे आयोजन केले होते त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या मालिकेमुळे अनेक जणांना प्रसिद्धी मिळाली. मालिकेतील नेहाची मैत्रिण शेफाली असो किंवा सिम्मी वहिनी असो यांच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या.

सेटवर सर्वांची लाडकी परी म्हणजेच मायरा वायकुळही पार्टीसाठी आली होती. मायरा मुळे ही सिरीअल खरं तर आणखी गाजली.

यश चा मित्र समीरची भूमिका साकारणारा संकर्षण कऱ्हाडे याने नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचं पडद्यावर दिसणंच अनेकदा चाहत्यांना आवडतं.

मालिकेत रेवतीची भूमिका साकारणाऱ्या नुपूर देठणकरने पार्टीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षंण कऱ्हाडे आणि इतरही कलाकार पार्टीत सामील झाले होते.

मालिकेचा शेवटचा सीन शूट करताना सर्वच भावूक झाले होते. मात्र सर्वांनी एकत्र येत धम्माल केली आणि शेवट गोड झाला. तसंच मालिका निरोप घेत असली तरी लवकरच काहीतरी सरप्राईज घेऊन येणार असल्याचं काल श्रेयस तळपदे आणि प्रार्थनाने जाहीर केलं.

मालिकेचा दुसरा भाग येणार की काय अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. आता ते सरप्राईज नक्की काय आहे हे लवकरच कळेल.