'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या फोटोंनी केला कहर, डीप नेक टॉपमध्ये हॉट झाली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 07:00 PM2024-06-15T19:00:56+5:302024-06-15T19:05:01+5:30

अनेकदा शिवाली तिचे फोटोही शेअर करताना दिसते. बोल्ड फोटोंनी शिवाली चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

कल्याणची चुलबुली अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे घराघरात पोहोचली. उत्तम अभिनय आणि कॉमेडीचा मेळ साधत शिवाली प्रेक्षकांचं मनोरंजन करते.

शिवालीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.

हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेल्या शिवालीने म्युझिक अल्बमध्येही काम केलं आहे. मालिका आणि सिनेमातही ती झळकली आहे.

अनेकदा शिवाली तिचे फोटोही शेअर करताना दिसते. बोल्ड फोटोंनी शिवाली चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

आतादेखील शिवालीच्या अशाच काही हॉट फोटोंची चर्चा रंगली आहे.

नुकतंच शिवालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. शिवालीने डीप नेक ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमधील शिवालीचा हॉट आणि बोल्ड अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

शिवालीचे हे फोटो चर्चेत असून नेटकऱ्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.