मराठी असूनही "डे" आडनाव का लावते ईशा? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सांगितलेलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:54 IST2026-03-12T17:51:01+5:302026-03-12T17:54:28+5:30

ईशा डे ही महाराष्ट्रीयन आहे. मराठी असूनही ईशा डे आडनाव का लावते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री ईशा डे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ईशाने अभिषेक खाणकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.

ईशाचा नवरा अभिषेक हा एक गीतकार असून त्याने काही मालिका आणि सिनेमांसाठी काम केलं आहे.

ईशा डे ही महाराष्ट्रीयन आहे. मराठी असूनही ईशा डे आडनाव का लावते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो.

एका मुलाखतीत ईशाने यामागचं कारण सांगितलं होतं. ईशाने लंडनमधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. तिथे असतानाच तिने नावात बदल केला.

ईशा म्हणाली होती "मी लंडन स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत होते. तिथे स्टेज नेम, स्क्रिन नेम घेण्याची पद्धत आहे. मी तिथे ऑडिशनसाठी जायचे तेव्हा माझं नाव ते विचारायचे".

"माझं खरं नाव ईशा वडनेरकर आहे. माझ्या आडनावाबद्दल जाणून घेण्यात त्यांना इंटरेस्ट वाटायचा. पण त्यामध्ये ऑडिशनच्या १५ मिनिटांच्या स्लॉटमधला बराचसा वेळ निघून जायचा".

"माझे जे ट्यूटर होते त्यांनी मला सांगितलं की इथे सगळे वेगळं नाव घेतात त्यामुळे तूदेखील घेऊ शकतेस. मग मी याबद्दल आईबाबांशी बोलले. आम्ही एकत्र बसून वेगवेगळी आडनावं काढली".

"मला सोपा शब्द हवा होता आणि त्यातून मी भारतीय असल्याचंही दाखवायचं होतं. मग अनेक नावांमधून ईशा डे हे नाव फायनल केलं", असं ईशा म्हणाली होती.

ईशाने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. हास्यजत्रेतून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते.