गौतमी पाटीलसोबत लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला- "तुझ्याबरोबर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:57 IST2026-02-18T17:51:44+5:302026-02-18T17:57:19+5:30

सबसे कातिल गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरुन गौतमीचं लग्न झालं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला.

सबसे कातिल गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरुन गौतमीचं लग्न झालं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला.

या व्हिडीओमध्ये गौतमीने हिरव्या रंगाची साडी नेसून डोक्याला मुंडावळ्या बांधल्याचं दिसलं होतं. हातात हिरवा चुडाही होता.

गौतमीसोबत या व्हिडीओत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता ओंकार राऊतही होता. ओंकारसाठी तिने खास उखाणाही घेतला.

"ना वायफाय ना इंटरनेट...गच्चीवर झाली आमची पहिली भेट, ओंकार रावांचं नाव घेते आमची जोडी एकदम परफेक्ट", असा उखाणा गौतमीने घेतला.

पण ओंकार आणि गौतमीने खरंच लग्न केलं नसून गच्ची या अल्बम साँगमधील हा व्हिडीओ आहे.

गौतमीसोबत काम केल्यानंतर ओंकारने त्याच्या अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे.

"गच्ची...सगळ्यांनी नक्की पाहा...गौतमी तुझ्याबरोबर काम करून खरंच खूप मज्जा आली", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.