दुसऱ्यांदा आई होणार भारती सिंग, पार पडलं लाफ्टर क्वीनचं बेबी शॉवर, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नंसी ग्लो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 16:22 IST2025-11-16T16:18:27+5:302025-11-16T16:22:18+5:30
भारतीचं बेबी शॉवर पार पडलं आहे. लाफ्टरशेफच्या सदस्यांनी भारती सिंगचं हे खास बेबी शॉवर केलं.

लाफ्टर क्वीन भारती सिंग दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारती आणि हर्ष लिंबाचियाने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली.

आता भारतीचं बेबी शॉवर पार पडलं आहे. लाफ्टरशेफच्या सदस्यांनी भारती सिंगचं हे खास बेबी शॉवर केलं.

याचे फोटो जन्नत झुबेरने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहे. भारतीच्या बेबी शॉवरला तेजस्वी प्रकाश, अली गोनी, कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, जस्मिन भासिन या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

बेबी शॉवरसाठी भारतीने खास वन पीस घातला होता. या फोटोंमध्ये भारतीच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो स्पष्टपणे दिसत आहे.

केक कापून छोटी पार्टी करत लाफ्टर क्वीनचं बेबी शॉवर करण्यात आलं.

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. ३ एप्रिल २०२२ रोजी त्यांना मुलगा झाला. ज्याचं नाव लक्ष आहे पण त्याला सगळेच लाडाने गोला म्हणून हाक मारतात.

भारतीचा मुलगा गोला लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. आता लग्नाच्या आठ वर्षानंतर भारती दुसऱ्यांदा मातृत्व अनुभवणार आहे.

















