लागिरं झालं जी फेम शिवानी बावकरचे ग्लॅमरस फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 15:07 IST2019-06-18T14:40:54+5:302019-06-18T15:07:22+5:30

प्रेक्षकांची आवडती लागिरं झालं जी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

लागिरं झालं जी या मालिकेतील शीतल ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

या मालिकेत शीतल ही भूमिका शिवानी बावकर साकारत असून या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

शिवानी लागिरं झालं जी या मालिकेत नेहमीच पंजाबी ड्रेस अथवा साडीत दिसते.

शिवानी तिच्या खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस असून ती खूपच वेगळी दिसते.

शिवानी तिचे अनेक फोटो नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करत असते.

शिवानीच्या चाहत्यांना तिचा हा ग्लॅमरस लूक प्रचंड आवडतो.

लागिरं झालं जी ही मालिका संपल्यानंतर शिवानीचे फॅन्स तिला मिस करणार यात काहीच शंका नाही.

शिवानी मुळची पुण्याची असून ती केवळ २५ वर्षांची आहे. तिला लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने ती अभिनयक्षेत्रात आपले नाव कमवण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईत राहात आहे.

अगले जन्म मोहे बिटिया ही किजो, फुलवा यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये शिवानी झळकली होती. तसेच तिने देवयानी, सुंदर माझं घर यांसारख्या मराठी मालिकांमध्ये देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.