जिममध्ये व्यायाम न करता कपिल शर्माने कमी केलं ११ किलो वजन? फॉलो केला २१-२१-२१ नियम
By देवेंद्र जाधव | Updated: July 29, 2025 11:42 IST2025-07-29T11:20:35+5:302025-07-29T11:42:52+5:30
कपिल शर्माने वजन कमी करण्यासाठी २१ - २१ -२१ नियम फॉलो केला. काय आहे यामागचं रहस्य?

कपिल शर्मा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. कपिल शर्मा द ग्रेट इंडियन शोचं सूत्रसंचालन करत आहे.
कपिल शर्माने या शोमध्ये सर्वांना थक्क करुन सोडलंय ते म्हणजे वजन कमी करुन. कपिल शर्माचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन बघून सर्वजण थक्क झाले.
वजन कमी करण्यासाठी कपिल शर्माने २१-२१-२१ नियम फॉलो केला होता. कपिलच्या ट्रेनरनेच हा खुलासा सर्वांसमोर केला.
कपिलचं शूटिंगचं वेळापत्रक, त्याचं अनियमित झोपणं या गोष्टींमुळे कपिल शर्माला वजन कमी करायला त्रास होत होता. याशिवाय त्याच्या शरीरामध्ये सूजही होती
सुरुवातीला योगासनांचा वापर करुन कपिलने शरीरातील लवचिकता वाढवण्यास मदत केली. त्यानंतर व्यवस्थित डाएट करुन कपिलने वजन कमी केलं.
जेवणामध्ये कपिल मच्छीचा समावेश करायचा. याशिवाय हिरव्या भाज्याही खायचा. त्यामुळे कपिलला योग्य ते प्रोटीन मिळायचं.
कोणतीही विशेष शारीरिक मेहनत न करता ६३ दिवसात कपिलने ११ किलो वजन कमी केलं. कपिल शर्माने वजन कमी करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याला लावलेली शिस्तही त्याला फायदेशीर ठरली