जुई गडकरीची परदेशवारी, फोटो शेअर करत म्हणाली "स्वत:साठी थोडा वेळ काढला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 17:02 IST2026-02-02T16:58:15+5:302026-02-02T17:02:36+5:30

अभिनेत्री जुई गडकरी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'मधील लाडकी सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मालिकेच्या व्यस्त शेड्युलमधून थोडा मोकळा वेळ काढत जुईने थेट परदेश गाठले आहे.

जुई सध्या हाँगकाँगमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत असून तिचे तिथले फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

जुईने तिच्या इन्स्टाग्रामवर हाँगकाँग ट्रिपचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

प्रवासाचं महत्त्व सांगताना ती लिहिते, "प्रवास केल्यावर माझं मन शांत होतं. स्वतःसाठी थोडा वेळ काढला, याची खूप गरज होती. अजून भरपूर प्रवास करणं बाकी आहे. सहलीच्या पहिल्या दिवसाचे क्षण शेअर करत आहे!! हाँगकाँग आहे हे".

या ट्रिपमध्ये ती खूपच फ्रेश आणि आनंदी दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हाँगकाँगमध्ये जुईने केवळ फिरण्याचाच नाही, तर तिथल्या खाद्यपदार्थांचा आणि शॉपिंगचाही मनमुराद आनंद लुटला आहे.

जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने आदर्श सुनेची, मुलीची भूमिका निभावली. पुढचं पाऊल मालिकेतून जुईला प्रसिद्धी मिळाली. ती एक उत्तम अभिनेत्री आहे.