'झांसी की रानी' मालिकेतील 'ही' बालकलाकार आठवतेय? १६ वर्षांत इतका बदलला लूक; गाजवतेय टीव्ही इंडस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:13 IST2025-11-07T17:50:23+5:302025-11-07T18:13:09+5:30
'झांसी की रानी' मालिकेतील 'ही' बालकलाकार आठवतेय? आता दिसते फारच सुंदर

छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात करणाही ही बालकलाकार आता मोठी झाली असून ती फारच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

२००९ मध्ये 'झांसी की रानी' या मालिकेतून अशनूर कौर हे नाव घराघरात पोहोचलं.याच मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेत तिने साकारलेल्या प्राची नावाच्या पात्रामुळे आजही ती चाहत्यांच्या लक्षात आहे.

याशिवाय अशनूर 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'कोई लौट के आया है' या मालिका तसंच काही म्यूझिक व्हिडिओंमध्येही झळकली आहे.

सध्या अशनूर कौर बिग बॉस १९ च्या पर्वात सहभागी झाल्याने ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे.

अशनूरचा जन्म ३ मे २००४ रोजी झाला. अशनूर आता १९ वर्षांची झाली असून तिच्या ग्लॅमरस फोटोंची कायम चाहत्यांमध्ये चर्चा सुरू असते.

अशनूर सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह आहे. त्याद्वारे तिचे बरेचसे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते.

त्यामधील तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत.

















