Jannat Zubair : "मला अरेंज मॅरेज करायचं आहे कारण माझ्याकडे आता काही ऑप्शनच शिल्लक राहिलेला नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:41 IST2025-04-01T13:36:58+5:302025-04-01T13:41:29+5:30
Jannat Zubair : जन्नत सध्या तिने केलेल्या लग्नाच्या विधानामुळे चर्चेत आली आहे.

जन्नत जुबैर ही टेलिव्हिजनवरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असते.
जन्नत सध्या तिने केलेल्या लग्नाच्या विधानामुळे चर्चेत आली आहे. लग्नाबद्दल तिने असं काही म्हटलं आहे ज्यामुळे तिचं ब्रेकअप झाल्याची लोकांना खात्री वाटत आहे.
जन्नत जुबैर आणि मिस्टर फैजू या दोघांमध्ये दुरावा आला असून त्याचं ब्रेकअप झाल्याचं कित्येक दिवसांपासून म्हटलं जात आहे.
जन्नत आणि फैजू यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉ़लो केलं आहे. हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. सतत एकत्र दिसायचे. अफेअरचीही चर्चा रंगली.
अभिनेत्रीने याच दरम्यान आपल्या लग्नाबाबत असं काही म्हटलं आहे ज्याने सर्वांनाच विचार करायला भाग पाडलं.
लग्नाबाबत काय प्लॅनिंग आहे असा प्रश्न जन्नतला विचारण्यात आला. तेव्हा तिने अरेंज मॅरेज करायचं असल्याचं सांगितलं.
"मला अरेंज मॅरेज करायचं आहे कारण माझ्याकडे आता काही ऑप्शनच शिल्लक राहिलेला नाही" असं स्पष्ट सांगितलं.
जन्नत जुबैर ही सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.