PHOTOS: 'किलर गर्ल' जान्हवी किल्लेकरचं सुंदर फोटोशूट, दिसतेय एकदम भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:04 IST2025-01-30T15:43:25+5:302025-01-30T16:04:33+5:30

'बिग बॉस' मराठी फेम जान्हवी किल्लेकरनं (Jahnavi Killekar) काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोशूटसाठी जान्हवीने गडद लाल रंगाचा अजरक कॉटन ड्रेस परिधान केला आहे.

या लूकवर तिनं ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत. त्यामुळे हा लूक एकदम भारी दिसतोय.

तिच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्साचा वर्षाव केलाय. जान्हवीचा मोठा चाहतावर्ग आहे.

जान्हवी अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.

सध्या ती स्टार प्रवाहवरील 'अबोली' (Aboli) या मालिकेत काम करत आहे.

या मालिकेत जान्हवी पोलीस अधिकारी दीपशिखा भोसलेची भूमिका साकारत आहे.

जान्हवी 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी झाली होती. बिग बॉसने तिला 'किलर गर्ल' अशी ओळख दिली.

जान्हवीने कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत 'सानिया' हे खलनायिकेचे पात्र साकारले होते.