खऱ्या आयुष्यात इतकी बोल्ड आहे इंदू, कधी विचारच केला नसेल, ग्लॅमरस फोटोंवरुन नजरही हटणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:18 IST2025-07-28T16:10:36+5:302025-07-28T16:18:06+5:30

मालिकेत साधी दिसणारी इंदू खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे.

'इंद्रायणी' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका. या मालिकेत छोट्या इंदूची भूमिका साकारून बालकलाकार सांची भोयर घराघरात पोहोचली. तर मोठ्या इंद्रायणीची भूमिका अभिनेत्री कांची शिंदे साकारत आहे.

तुकोबांचे अभंग गात वारकरी वारसा पुढे नेणारी साधी पण तितकीच समंजस इंदू प्रेक्षकांना आवडते.

पण, मालिकेत साधी दिसणारी इंदू खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे.

अभिनेत्री कांची शिंदे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. तिने काही मालिकांमध्येही काम केलं आहे.

कांचीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

तिचे हे फोटो पाहून चाहत्यांचा विश्वासच बसणार नाही इतकी ती बोल्ड आहे.

अभिनेत्री असण्यासोबतच ती एक लावणी डान्सरही आहे. कांची सध्या २५ वर्षांची आहे.

इन्स्टाग्रामवर तिचे ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.