Photos: भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा हॉट अवतार, धबधब्याखाली चिंब भिजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 19:07 IST2026-03-31T18:55:44+5:302026-03-31T19:07:22+5:30

साडी असो वा वेस्टर्न आऊटफिट ती प्रत्येक लुकमध्ये स्टायलिश व हॉट दिसते.

भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहर तिच्या बोल्ड लुक्समुळे कायमच चर्चेत असते.

साडी असो वा वेस्टर्न आऊटफिट ती प्रत्येक लुकमध्ये स्टायलिश व हॉट दिसते.

मालती तिच्या विविध फोटोशूटमधून बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.

नुकतंच मालती चहर कोसळणाऱ्या धबधब्याखाली मनसोक्त आनंद लुटताना दिसली. पांढऱ्याशुभ्र फेसळणाऱ्या पाण्याच्या धारेखाली ती मनसोक्त भिजली.

धबधब्याखाली मालती चहर बिकिनीमध्ये पोझ देताना दिसत आहे. हा लुक कमालीचा कातील आहे.

या फोटोला मालती चहरने कॅप्शनही दिलं आहे. "धबधबे मला आठवण करून देतात की काही गोष्टी सोडून देणं किती सुंदर असतं", असं तिनं लिहलं.

तिचे हे फोटो चाहत्यांना आवडले आहेत. तिच्या बोल्ड लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मालती ही 'बिग बॉस १९' च्या पर्वात दिसली होती. 'बिग बॉस १९'च्या घरात मालती आणि मराठमोळा प्रणित मोरे यांच्यातील मैत्री आणि त्यानंतर झालेल्या मतभेदांची सोशल मीडियावर खूप चर्चा होती.

वयाची ३५ वर्षे ओलांडली असली तरी मालतीने अद्याप लग्नाचा कोणताही विचार केलेला नाही.

मालती चहरचे महेंद्रसिंह धोनीसोबतचे नाते अतिशय जवळचे आहे. ती धोनीला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे मानते.