काम हवंय तर घालवावी लागणार एक रात्र, दिग्दर्शकाने अभिनेत्रीला सांगितले होते तडजोड करायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 16:21 IST2020-12-23T16:14:36+5:302020-12-23T16:21:48+5:30

स्वप्नांची नगरी... मायानगरी... मुंबई.... या दुनियेत स्वतःचं नाव आणि पैसा कमावण्याचं स्वप्न ऊराशी बाळगून अनेकजण मुंबईत येतात. मात्र इथं स्वतःची ओळख बनवणं तितकंच सोपं नसते. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आणि ध्येयपूर्तीसाठी अनेक खडतर मार्ग त्यांना पार करावे लागतात. यातूनच कास्टिंग काऊच, बडे निर्माते-दिग्दर्शक किंवा दिग्गज कलाकारांकडून होणाऱ्या छळाचा सामना करत तडजोड करावी लागते.

हिंदी चित्रपटटसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून #MeToo ही मोहिम जोरात सुरू होती.या अंतर्गत अनेक अभिनेत्री आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.

तनुश्री दत्ता, कंगणा राणौत, काल्की कोचलिन, रिचा चढ्ढा, सोनम कपूर, सुचित्रा कृष्णमूर्ती, विनता नंदा, केट शर्मा अशा कित्येकजणींनी आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना वाचा फोडली होती.

#Metoo नंतर आता अभिनेत्री न घाबरता त्यांच्यासह घडलेल्या प्रसंगाविषयी बोलतात. दिवसेंदिवस या घटना कमी होण्यापेक्षा वाढतच आहेत.

डोनल बिष्टनेही तिच्या एका मुलाखतीत तिच्यासह घडलेला प्रसंग सांगितला.

अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिलेल्या डोनलनेही इतरांप्रमाणे स्ट्रगल करायला सुरूवात केली.

डोनल ऑडीशनसाठी जायची तिथे दिग्दर्शक तडजोड करायला सांगायचे. अभिनेत्री बनण्यापूर्वी डोनलने पत्रकार म्हणूनही काम केले आहे.

कॅमे-यासमोर काम करण्याचे डोनलचे स्वप्न पाहिले होते. मात्र ते पत्रकार म्हणून नाही तर अभिनेत्री बनून तिला कॅमेरा समोर यायचे होते.

अभिनेत्री बनण्याचे स्वप्न डोनला स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर तिने पत्रकारिता सोडली आणि अभिनेत्री बनण्यासाठी स्ट्रगल करायला सुरूवात केली.

करिअरच्या सुरूवातील मोठ्या आत्मविश्वासने तिने सुरूवात केली होती. मात्र इंडस्ट्रीचा खरा चेहरा समोर आला तेव्हा मात्र डोनलला इथे कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही याची जाणीव झाली होती.

जिद्द आणि मेहनतीमुळेच तिला अखेर काम मिळाले. 'रूप-मर्द का नया स्वरूप', 'दिल तो हैपी है जी' आणि 'लाल इश्क' सारख्या मालिकेत तिला काम करण्याची संधी मिळाली होती.याशिवाय रियलिटी शो 'चित्रहार'चेही तिने सुत्रसंचालन केले होते.