हितेन तेजवानी आणि गौरी प्रधानचे रोमँटिक फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 04:25 PM2020-03-06T16:25:07+5:302020-03-06T16:34:54+5:30

हितेन तेजवानीचा नुकताच वाढदिवस झाला असून त्याने वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची पत्नी गौरी प्रधानसोबत काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हितेन आणि गौरीची पहिली ओळख एका जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने झाली होती.

गौरी आणि हितेनने कुटुंब, क्योंकी साँस भी कभी बहू थी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

हितेन हा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच बिग बॉसमध्ये देखील तो झळकला होता.

गौरीसोबत लग्न व्हायच्याआधी हितेनचे लग्न झालेले होते. पण लग्नाच्या काहीच महिन्यात त्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता. गौरीला पाहाताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता.

हितेन सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या कुटुंबियांचे अनेक फोटो आपल्याला त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.

गौरी आणि हितेन यांना दोन मुलं असून त्यांच्या मुलांची नावं निवान आणि कात्या अशी आहेत.