लहानपणी हृदयात छिद्र, डॉक्टरांनीही सोडलेली आशा; मृत्यूच्या दाढेतून परत आली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:07 IST2025-04-02T17:00:39+5:302025-04-02T17:07:23+5:30

नीती टेलर ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

लोकप्रिय हिंदी टीव्ही सिरिअल 'कैसी ये यारियॉं', 'बडे अच्छे लगते हैं २' मधून नीती टेलर हे नाव प्रसिद्धीझोतात आली. याशिवाय वेगवेगळ्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

नीती तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर सुद्धा ती प्रचंड सक्रिय असते.

परंतु तुम्हाला माहिती आहे का, लहान असताना अभिनेत्रीच्या हृदयात छिद्र होतं.

त्यामुळे तिला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला.

याचा खुलासा तिने डान्स रिएलिटी शोमध्ये केला होता.

त्यादरम्यान, ती म्हणाली की, 'जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा काही वेळासाठी माझा श्वास थांबला होता. तेव्हा मी मृत्यूच्या दाढेतून परत आले.तेव्हापासूनच मी आयुष्यात स्ट्रगल पाहिलं आहे." असा खुलासा तिने केला होता.

नीती टेलर तिच्या फॅशन सेन्सने देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर चर्चेत असते.