प्रियदर्शनी इंदलकरच्या बहिणीला पाहिलंत? डाऊन सिंड्रोम असूनही ऑलिम्पिकमध्ये जिंकलंय सिल्व्हर मेडल
By देवेंद्र जाधव | Updated: August 6, 2025 13:34 IST2025-08-06T12:35:06+5:302025-08-06T13:34:58+5:30
प्रियदर्शनी इंदलकरने पहिल्यांदाच बहिणीविषयी व्यक्त केल्या भावना. प्रियदर्शनीच्या बहिणीने भारताचं नाव उंचावलं आहे. जाणून घ्या

प्रियदर्शनी इंदलकर ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री. प्रियदर्शनीने एका मुलाखतीत पहिल्यांदाच तिच्या बहिणीबद्दल खुलासा केला.
प्रियदर्शनीच्या बहिणीचं नाव आहे मधुमती इंदलकर. प्रियदर्शनी आणि मधुमती या बहिणींचं खास नातं आहे.
प्रियदर्शनी आणि मधुमती या सख्ख्या बहिणी नसून त्या चुलत बहिणी आहेत. परंतु तरीही प्रियदर्शनीचं मधुमतीसोबत सख्ख्या बहिणीसारखंच नातं आहे
मधुमती इंदलकर ही प्रियदर्शनीपेक्षा वयाने मोठी आहे. त्यामुळे मोठ्या बहिणीप्रमाणेच मधुमती प्रियदर्शनीला प्रेमाने ओरडत असते.
मधुमतीला डाऊन सिंड्रोम आहे. परंतु प्रियदर्शनी आणि तिचं कुटुंब कधीही तिला वेगळी वागणूक देत नाहीत. सामान्य माणसासारखंच मधुमतीला वागवलं जातं.
मधुमती सुद्धा एक अभिनेत्री आणि डान्सर आहे. इतकंच नव्हे तिने स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारताला सिल्व्हर मेडल जिंकून दिलंय.
युनिकनेस विथ दिस अॅबिलिटी या युट्यूब चॅनलवर प्रियदर्शनीने बहिणीचं कौतुक केलं. स्पेशल ऑलिम्पिकमध्ये Bocce या खेळात मधुमतीने सिल्व्हर मेडल पटकावलं आहे