ऑनस्क्रीन आईच्या प्रेमात पडला अभिनेता; साडेचार वर्षे केले डेट, पण अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:02 IST2025-08-12T17:54:16+5:302025-08-12T18:02:54+5:30

मालिकेत आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता 'हा' अभिनेता

टीव्ही मालिकांमध्ये काम करताना अनेक कलाकार सहवासाने एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग लग्न करतात. पण एक अभिनेता हा आपल्या ऑनस्क्रीन आईच्या प्रेमात पडला होता.

टीव्ही इंडस्ट्रीत अशी एक जोडी आहे जे मालिकेत मायलेकाची भूमिका साकारत होते. पण तेच एकमेकांच्या प्रेमात पडले. पण, नंतर त्यांच्यात दुरावा आला.

ते आहेत अभिनेता हर्षद अरोरा (Harshad Arora) आणि अभिनेत्री अर्पणा कुमार (Aparna Kumar). हे दोघे 'मायावी मलंग' या मालिकेत एकत्र काम करत होते.

अपर्णाने टीव्हीवर हर्षदच्या आईची भूमिकाही साकारली होती. सेटवर काम करताना ही मायलेकाची जोडी खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले.

दोघांनीही साडेचार वर्षे डेट केले. पण नंतर त्याचं ब्रेकअप झालं आणि दोघांनी आपले वेगवेगळे मार्ग निवडले. परस्पर संमतीने नात संपवल्याचं अभिनेत्यानं म्हटलं होतं.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हर्षद म्हणाला होता की, "आमचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही याचे मला वाईट वाटते. आम्ही आमचे वेगळे मार्ग निवडत आहोत. नात्यांमध्ये जबाबदाऱ्या पूर्ण करणे ही मोठी भूमिका असते. मला सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आम्ही परस्पर संमतीने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे".

गेल्यावर्षी हर्षद अरोराने मोठ्या थाटामाटात मुस्कान राजपूतसोबत लग्न केले.

हर्षद अरोराने २०१३ मध्ये कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय 'बेइंतेहा' या मालिकेतून पदार्पण केलं होतं. या मालिकेत त्याने साकारलेली झैन अब्दुल्लाहची भूमिका चांगलीच गाजली होती.

त्यानंतर स्टार प्लसवरील 'दहलीज' या मालिकेत त्याने आयएएस अधिकारी आदर्श सिन्हाची भूमिका साकारली होती. २०१५ मध्ये त्याने 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी ६' या शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. तसेच तो तो 'थोडासा बादल थोडा सा पानी' आणि 'गुम है किसीके प्यार में' मध्येही दिसला होता.