राणादा अन् पाठकबाईंचा लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा; चाहत्यांसाठी शेअर केले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 12:41 PM2023-03-22T12:41:38+5:302023-03-22T12:52:49+5:30

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधून राणादा आणि पाठकबाईंची जोडी हिट ठरली होती.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधून राणादा आणि पाठकबाईंची जोडी हिट ठरली होती. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती.

या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि पाहतापाहता त्यांच्या गळ्यातलं ताईत झाली. आज या जोडीकडे महाराष्ट्राचं फेव्हरेट कपल म्हणून पाहिलं जातं.

आता हे रिल लाइफमधील कपल रिअल लाइफमध्ये लग्नबेडीत अडकले. हार्दीक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांचा २ डिसेंबर २०२२रोजी विवाह संपन्न झाला.

लग्नानंतरचे काही दिवस त्यांनी एकमेकांबरोबर छान व्यतित केले. त्यासाठी दोघांनीही कामातून ब्रेक घेतला होता.

भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षारंभानिमित्ताने आज सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण आहे.

अनेक मराठी कलाकार गुढीपाडव्याचा सण पारंपारिक पोषाख परिधान करत मोठ्या उत्साहात साजरे करत आहे.

दोघांनीही खास फोटो शेअर करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हार्दिक आणि अक्षया यांचा लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा आहे.