गौतमी पाटीलचा साजिरा-गोजिरा अवतार, गुढी पाडव्यानिमित्त खास फोटोशूट; चाहत्यांच्या नजरा खिळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:37 IST2026-03-17T13:50:52+5:302026-03-17T14:37:32+5:30
गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी चर्चा तिच्या डान्सची नाही, तर तिच्या सौंदर्याची आहे.

आपल्या हटके नृत्याने आणि अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी 'लोकप्रिय नृत्यांगना' गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

निमित्त आहे गुढीपाडव्याचे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गौतमीने एक विशेष फोटोशूट केले.

यंदा गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा साजरा होणार असून, याच दिवसापासून नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे.

या मंगलमयी दिनाचे औचित्य साधत गौतमीने आपल्या खास लूकची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

यामध्ये तिचा पारंपारिक मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. सुंदर साडी, गळ्यात दागिणे, नाकात नथ अशा पेहरावात गौतमीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

गौतमीने अगदी साडील साजेसा मेकअप आणि केसांची आकर्षक हेअरस्टाईल करत कपाळावर टिकली लावली आहे.

गौतमीने या फोटोशूटसाठी निवडलेली साडी जितकी सुंदर आहे, तितकाच तिचा ब्लाऊजही लक्षवेधी आहे. हाताने नक्षीकाम केलेल्या 'आरी वर्क' मुळे तिच्या ब्लाऊजला एक रॉयल लूक मिळाला आहे.

हातात आरतीचे ताट धरून तिने दिलेल्या विविध पोजेस सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

गुढी पाडव्याच्या सणाला साजेसा तिचा हा लूक चाहत्यांना विशेष भावला असून तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

















