'टीव्ही क्वीन' खऱ्या आयुष्यातही राहते राणीसारखी; जाणून घ्या, सिंगल मदर असलेल्या एकताचं Networth
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 14:09 IST2022-06-07T14:04:12+5:302022-06-07T14:09:31+5:30
Ekta kapoor: एकताला लक्झरी गाड्यांची विशेष आवड आहे, त्यामुळे तिच्याकडे फोर्ड, मर्सिडीज बेंझ, बीएमडबल्यू, ऑडी यांसारख्या गाड्या आहेत.

टीव्ही क्वीन या नावाने ओळखली जाणारी लोकप्रिय निर्माती म्हणजे एकता कपूर. आजवरच्या कारकिर्दीत एकताने असंख्य गाजलेल्या मालिकांची निर्मिती केली.
टीव्हीप्रमाणेच एकताने ओटीटीवरही पदार्पण केलं आहे. त्यामुळे सध्या एकता तिच्या मालिकांसह वेब शोमुळेही चर्चेत येत असते.
छोट्या पडद्यावरील मोस्ट पॉवरफूल पर्सनालिटी म्हणून एकताकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे सिंगल मदर असलेली एकता कमाईच्या बाबतीत अनेक भल्याभल्या स्टार्सवर मात करत आहे.
सक्सेसफूल बिझनेसवूमन असलेली एकता प्रचंड लॅव्हिश लाइफ जगत असून तिचं एकूण नेटवर्थ किती ते पाहुयात.
मुंबईमध्ये एकताचं आलिशान घर असून याची किंमत ७ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.
भारतासह विदेशातही एकताने आर्थिक गुंतवणूक केली आहे.
एकताला लक्झरी गाड्यांची विशेष आवड आहे, त्यामुळे तिच्याकडे फोर्ड, मर्सिडीज बेंझ, बीएमडबल्यू, ऑडी यांसारख्या गाड्या आहेत.
एकता बालाजी टेलिफिल्मची ज्वाइंट मॅनेजिंग डायरेक्टर आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. तसंच यशस्वी निर्मातीदेखील.
एकताच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये आतापर्यंत ३९ चित्रपट, ४९ सीरिज आणि १३५ मालिकांची निर्मिती करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, २०२१ मध्ये एकताचं नेटवर्थ ९५ कोटी रुपये होतं. त्यानुसार, ती महिन्याला जवळपास १ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करते.
एकता सिंगल मदर असून तिने २०१९ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला आहे.