लय भारी दिसते 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची पत्नी, अभिनय नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:49 IST2025-06-30T15:42:34+5:302025-06-30T15:49:34+5:30

Nilesh Sable : अभिनेता निलेश साबळे मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेता आहे. फू बाई फूमुळे तो लोकप्रिय झाला आणि चला हवा येऊ द्या या शोमधून तो घराघरात पोहचला.

अभिनेता निलेश साबळे मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेता आहे. फू बाई फूमुळे तो लोकप्रिय झाला आणि चला हवा येऊ द्या या शोमधून तो घराघरात पोहचला.

निलेश साबळे लिखाण करतो, अभिनय आणि दिग्दर्शनही करतो. त्याने डॉक्टरीचे शिक्षण घेतले आहे.

निलेशने आयुर्वेदाची एम एसची पदवी घेतली असली तरी त्याला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. विविध कलाकारांच्या नकला करण्यात पटाईत असल्याने कॉलेजमध्ये तो प्रसिद्ध होता.

शिक्षण घेतल्यानंतर त्याने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात भाग घेतला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

निलेशला त्याच्या करिअरमध्ये त्याची पत्नी गौरी साबळेची मोलाची साथ लाभली आहे.

गौरी साबळे देखील ग्रॅज्युएट असून तिचा सिनेइंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही. निलेश आणि गौरीचा गेल्या ११ वर्षांपासून सुखी संसार सुरू आहे.

निलेशची पत्नीसुद्धा एक डॉक्टरच आहे. ती दिसायलाही सुंदर आहे.

निलेश साबळे शेवटचा 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या शोमध्ये पाहायला मिळाला. पण या कार्यक्रमाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

निलेशच्या अभिनयाचे, त्याच्या सूत्रसंचालनाचे आज अनेक फॅन आहेत.