९०च्या दशकातील लोकप्रिय मालिका 'दे धमाल' आठवतेय का?, बालकलाकारांना आता ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 07:36 PM2024-04-16T19:36:04+5:302024-04-16T19:57:12+5:30

De Dhamal Serial : तुम्ही जर तुम्ही ९०च्या काळात जन्माला आला असाल तर तुम्ही अल्फा मराठी म्हणजेच आताच्या झी मराठीवर 'दे धमाल' ही मालिका नक्कीच पाहिली असेल. या मालिकेतील पात्रे झंप्या, वरूण, निनाद, ऋतूजा, स्पृहा, शीतू, चीनू, ही सगळीच पात्र चांगलीच गाजली. मात्र हे सर्व कलाकार सध्या काय करत आहेत, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल चला तर जाणून घेऊया.

तुम्ही जर तुम्ही ९०च्या काळात जन्माला आला असाल तर तुम्ही अल्फा मराठी म्हणजेच आताच्या झी मराठीवर दे धमाल ही मालिका नक्कीच पाहिली असेल. अष्टवेध नावाची सोसायटी आणि या सोसायटीमध्ये २ मुलांचं गट. एक गट अभ्यासू,हुशार मुलांचा व तर दुसरा मस्तीखोर दंगामस्ती, उचापती खोड़करपणा करणाऱ्या मुलांचा.

या मालिकेतील पात्रे झंप्या, वरूण, निनाद, ऋतूजा, स्पृहा, शीतू, चीनू, ही सगळीच पात्र चांगलीच गाजली. मात्र हे सर्व कलाकार सध्या काय करत आहेत, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल चला तर जाणून घेऊया.

या मालिकेत ऋतुजा साकारणारी प्रिया बापट आज मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रिया लहानपणापासूनच नाटक सिनेमा मालिका या माध्यमातून आपल्या समोर आली आहे.

या मालिकेत ऋतुजाची सख्खी बहीण म्हणून स्पृहा हे पात्र साकारणारी स्पृहा जोशी देखील आज इंडस्ट्रीमधील नावाजलेली अभिनेत्री आहे.

या मालिकेतील वरूण म्हणजेच अभिनेता दुष्यंत वाघने पुढे जाऊन बॉलीवूडच्या सर्वात लोकप्रिय चित्रपटात आयकॉनिक भूमिका साकारली, तुम्हाला थ्री इडियट्समधील मिलीमीटर तर माहितच असेल. हा मिलीमीटर दुसरा तिसरा कोणी नसून दे धमाल मधील खट्याळ वरूनच होता. दुष्यंत अनेक हिंदी मालिका आणि पानिपत, महाराष्ट्र शाहीर, धर्मवीर यासारख्या चित्रपटामध्ये झळकला आहे.

या मालिकेतील सर्वात खोडकर आणि सर्वांचं लाडकं पात्र म्हणजे झंप्या. हे पात्र साकारणारा भूषण धुपकर देखील कलाक्षेत्रात कार्यरत आहे. भूषण नकटीच्या लग्नाला यायचं हां , मेरे साई यासारख्या मालिकांमधून झळकला. तर बॉलिवूडमध्ये ड्रीम गर्ल, गुडन्यूज यासारख्या चित्रपटात पाहायला मिळाला आहे.

या चांडाळ चौकडीमध्ये अमेय हे पात्र साकारणारा अमेय कदम हा सध्या भाडीपा या युट्युब चॅनेलसाठी सध्या फूड व्लॉगीन सिरीज करताना दिसतो. या शिवाय 'ऐकावं जनाचं करावं मनाचं; नावाचं पॉडकास्ट देखील होस्ट करतो.

दे धमाल मधला गोंडस चिनू म्हणजे अभिनेता अनुराग वरळीकर दे धमाल नंतर अनेक चित्रपट मालिकांमध्ये झळकला. सध्या अनुराग जाहिरात आणि चित्रपटांचे सहायक दिग्दर्शनाचं काम बघतो.

मालिकेतील निनाद हे पात्र साकारणारा निनाद लिमये देखील आज अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. निनाद तुझं माझं ब्रेकअप, तू माझा सांगाती यासारख्या मालिकांमधून झळकला. सध्या त्याचे चारचौघी हे नाटक चांगलाच गाजतंय

मंजूचे पात्र साकारणारी शाल्मली ओझेने मात्र या क्षेत्राला रामराम केला आहे. ती सध्या एक नामांकित हॉटेल मध्ये शेफ म्हणून काम करत असल्याचे सांगितले जाते.

या मालिकेत संदीप पाठकने देखील काम केले आहे.

अभिनेता प्रियदर्शन जाधव दादाच्या भूमिकेत पाहायला मिळाला.