'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या खऱ्या आयुष्यातील आईला पाहिलंत का?, मायलेकींमध्ये आहे छान बॉण्डिंग, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 13:09 IST2022-05-10T12:58:38+5:302022-05-10T13:09:32+5:30
Ranga Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपाच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) घराघरात पोहचली आहे.

'रंग माझा वेगळा' (Ranga Maza Vegla) मालिकेतील दीपाच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) घराघरात पोहचली आहे.
रेश्मा शिंदे हिने दीपाच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकताच रेश्मा शिंदेने आईसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
यापूर्वीही रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रेश्मा आणि तिच्या आईमध्ये छान बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.
रेश्मा शिंदेच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
तसेच तिने तिच्या आई वडिलांसोबतचा फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
रेश्मा शिंदे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.