डॉक्टर अजितकुमारची रिअल लाइफ बहीणदेखील आहे अभिनेत्री; 'या' मालिकेत दोघांनी केलंय एकत्र काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:00 AM2022-03-16T08:00:00+5:302022-03-16T08:00:00+5:30

Kiran gaikwad: किरणप्रमाणेच त्याची बहीणदेखील मराठी कलाविश्वात कार्यकत आहे.

लागिरं झालं जी, देवमाणूस या तुफान गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड.

किरणला खरी ओळख देवमाणूस या मालिकेतून मिळाली. या मालिकेत त्याने डॉक्टर अजितकुमार ही भूमिका साकारली आहे.

या मालिकेला मिळालेल्या यश आणि प्रेमामुळे त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला.

किरणच्या प्रोफेशन लाइफविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, यावेळी आपण त्याच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेऊयात.

किरणप्रमाणेच त्याची बहीणदेखील मराठी कलाविश्वात कार्यकत आहे.

किरणच्या बहिणीचं नाव योगिनी पोफळे आहे. योगिता तिच्या सासरचं आडनाव लावते.

योगिनीने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

योगिनी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे.

योगिनी आणि किरण गायकवाड यांनी लागिरं झालं जी या मालिकेत एकत्र काम केलं आहे. या मालिकेत तिने भैय्यासाहेबच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली आहेय