डॉ. तारिकाच्या 'सुपरहॉट' अदा! CID फेम श्रद्धा मुसळेने केलेल्या नव्या फोटोशूटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 20:46 IST2025-01-27T20:23:00+5:302025-01-27T20:46:09+5:30

CID fame Doctor Tarika Shraddha Musale Photos : डॉ. तारिका हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या फोटोंना चाहत्यांचीही पसंती

CID ही एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सर्वच पात्रं सुपर-डुपर हिट ठरली. यातील एक लोकप्रिय पात्र म्हणजे फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. तारिका.

डॉ. तारिका हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे श्रद्धा मुसळे. श्रद्धा आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर कायमच अँक्टिव्ह असते.

नुकतंच तिने केलेल्या फोटोशूटची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगलीय. श्रद्धाच्या ग्लॅमरस लूकमधील फोटोंवर लाइक्स अन् कमेंट्सचा भरपूर वर्षाव होतोय.

श्रद्धा मुसळेने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला खरी ओळख ही सीआयडी या मालिकेतील डॉ. तारिका या व्यक्तिरेखेने मिळवून दिली.

श्रद्धा मुसळेच्या CID मधील भूमिकेचे साऱ्यांनीच कौतुक केले होते. तिची इन्स्पेक्टर अभिजीतसोबतची रोमँटिक केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना आवडली.

हल्ली मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहते. ती फिटनेसच्या बाबतीत खूपच आग्रही असून ती आपले फोटोज पोस्ट करत असते.

श्रद्धाच्या विविध मूडमधील आउटफिट्सना खूप चांगली पसंती मिळते. चाहते तिच्या फोटोंवर मनापासून लाइक्स आणि कमेंट करताना दिसतात.