CHYD: भाऊ, कुशलपेक्षा श्रेया बुगडे घ्यायची जास्त पैसे? जाणून घ्या मानधनाचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 15:35 IST2025-07-11T15:08:12+5:302025-07-11T15:35:12+5:30

'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागासाठी हे कलाकार किती मानधन घ्यायचे हे तुम्हाला माहितीये का?

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पर्वातून काही जुन्या कलाकारांचा पत्ता कट झाला आहे.

'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे हे कलाकार घराघरात पोहोचले.

यंदाच्या पर्वात भाऊ कदम आणि निलेश साबळे दिसणार नाहीत. पण, श्रेया, कुशल आणि भारत गणेशपुरे असणार आहेत.

'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागासाठी हे कलाकार किती मानधन घ्यायचे हे तुम्हाला माहितीये का?

मीडिया रिपोर्टनुसार, 'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी भाऊ कदम ८० हजार रुपये मानधन घ्यायचा.

तर भारत गणेशपुरेला अंदाजे ७५ हजार रुपये इतकं मानधन मिळायचं.

कुशल बद्रिकेलाही अंदाजे एका एपिसोडसाठी ७५ हजार रुपये इतकी फी मिळायची.

तर श्रेया बुगडेही जवळपास भारत, कुशल आणि भाऊ कदम यांच्या इतकीच फी घ्यायची.

'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी श्रेया अंदाजे ८० हजार रुपये मानधन घ्यायची.