मराठमोळ्या पद्धतीने श्रेया बुगडेने सजवलंय घर; पाहा तिच्या घराचे Inside photo

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 12:19 PM2023-05-28T12:19:18+5:302023-05-28T12:28:26+5:30

Shreya bugade: श्रेयाला बाल्कनी आणि बाल्कनी सजवणं या दोन गोष्टींची विशेष आवड असल्याचं लक्षात येतं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.

'चला हवा येऊ द्या'मधील हुकमी एक्का म्हणून श्रेयाकडे पाहिलं जातं.

आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर श्रेयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा असते.

सध्या नेटकऱ्यांमध्ये श्रेयाच्या घराची चर्चा रंगली आहे.

श्रेयाने अत्यंत नीटनेटकपणाने तिचं घर सजवलं आहे.

या घरात तिने मराठमोळा टच द्यायचा प्रयत्न केला आहे.

घरातील प्रत्येक गोष्ट निवडण्यापूर्वी श्रेयाने बराच विचार केल्याचं दिसून येतं.

श्रेयाला बाल्कनी आणि बाल्कनी सजवणं या दोन गोष्टींची विशेष आवड असल्याचं लक्षात येतं.