छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार, मराठमोळा साजश्रृंगार केलेल्या अभिनेत्रीला ओळखले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:39 IST2021-09-11T15:28:04+5:302021-09-11T15:39:40+5:30

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. गौतमी देशपांडेचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे.

या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.

एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी गौतमी पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

शेअर केलेल्या फोटोला तिने खास कॅप्शनही दिले आहे.

याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.

गौतमी छोट्या पडद्यावरील 'माझा होशील ना ' मालिकेतून प्रकाशझोतात आली.

गौतमीची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत आहे.

सोशल मीडियावरही ती चाहत्यांच्या संपर्कात असते.