Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 00:37 IST2024-09-22T00:14:10+5:302024-09-22T00:37:09+5:30

Bigg Boss Marathi Hot Actress Photos: बिग बॉस मराठी शो मधील एक माजी स्पर्धक सध्या बोल्डनेसमुळे चर्चेत आलीय

Bigg Boss Marathi Hot Actress Photos: बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या महाराष्ट्रभर गाजतोय. ५० दिवसांहून अधिक काळ झालेल्या या सीझनची खूप चर्चा आहे.

गेल्या चार सीझनमधील स्पर्धक याबद्दल व्यक्त होत आहेत. मात्र काही स्पर्धक त्यांच्या हॉटनेसमुळेही चर्चेत आहेत.

रुचिरा जाधव हेदेखील त्यातीलच एक नाव. रुचिरा जाधव ही बिग बॉस मराठीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आली.

बिग बॉसमध्ये रुचिरा सगळ्यांना आवडली. पण तिचा हॉट, बोल्ड अन् बिनधास्त अंदाज आधीपासूनच साऱ्यांना परिचित होता.

झी मराठी वरील एका मालिकेत तिने आपल्या बोल्ड लूक अन् कातिल अदांनी अनेकांना घायाळ करून सोडले आहे

रुचिरा जाधवने सध्या आपला नवा फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात ती खूपच बोल्ड दिसतेय

एका सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी रुचिराने हे नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये तिने दिलेल्या पोज एकदम भारी आहेत

क्रॉप टॉप अन डेनिम शॉर्ट्स असा बोल्ड अँड बिनधास्त लूक करून रुचिराने नवं फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळत आहे