"फोटो काढला नाही म्हणून त्याने माझ्यासमोर त्याचा हात कापून घेतला...", राधा पाटीलने सांगितला चाहत्याचा भयानक किस्सा
By कोमल खांबे | Updated: January 21, 2026 12:26 IST2026-01-21T11:49:34+5:302026-01-21T12:26:54+5:30
फोटो दिला नाही म्हणून त्या चाहत्याने राधासमोर हातच कापून घेतला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर राधा प्रचंड घाबरली होती.

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'मध्ये प्रेक्षकांची लाडकी कातिलों की कातिल राधा पाटील सहभागी झाली आहे. राधाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

राधाच्या शोला चाहते प्रचंड गर्दी करतात. अशाच एका चाहत्याचा भयानक किस्सा राधाने गप्पा कट्टा या पॉडकास्टमध्ये सांगितला होता.

फोटो दिला नाही म्हणून त्या चाहत्याने राधासमोर हातच कापून घेतला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर राधा प्रचंड घाबरली होती.

चाहत्याचा हा किस्सा सांगताना राधा म्हणाली, "पुण्याला माझा शो होता आणि तिथे एका चाहत्याने मी फोटो दिला नाही म्हणून हात कापून घेतला होता.

"खरं तर तिथे खूप गर्दी होती. त्यामुळे मला त्याच्यापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं आणि गर्दीमुळे त्यालाही माझ्यापर्यंत येता येत नव्हतं".

"त्याने मला व्हॅनिटीमधून हात दाखवला. त्याच्या हातात चावी का काहीतरी होती. त्यानेच त्या चाहत्याने हातावर संपूर्ण कट मारले. ते पाहून मला खूप भीती वाटायला लागली होती".

"ते पाहून मी बाउन्सरला सांगितलं की त्याने हात कापून घेतलाय. मला त्याचं रक्त दिसतंय. मग त्याला बाजूला घेऊन आम्ही पट्टी वगैरे लावली".

"त्याला आम्ही समजावलं की असं नको करूस. त्यानंतर मग मी त्याला फोटो दिला. त्याने त्याच्या रक्ताने माझं पेटिंग काढून आणलं होतं. ते मी आजही माझ्या घरात लावलं आहे".

















