Bigg Boss Marathi 6: ८०० खिडक्या अन् ९०० दारं; 'बिग बॉस मराठी ६'चं चकवा देणारं घर, पाहा Inside फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 10:18 IST2026-01-11T09:36:31+5:302026-01-11T10:18:26+5:30

Bigg Boss Marathi 6 House Photos: 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात यंदा ८०० खिडक्या अन् ९०० दारं ही थीम करण्यात आली आहे. घरात सगळीकडे दार अन् खिडक्या दिसत आहेत.

'बिग बॉस मराठी ६' हे पर्व आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाची थीमही फारच खास आहे.

'बिग बॉस मराठी ६'च्या घरात यंदा ८०० खिडक्या अन् ९०० दारं ही थीम करण्यात आली आहे. घरात सगळीकडे दार अन् खिडक्या दिसत आहेत.

यंदाच्या पर्वातही घरात मोठा प्रशस्त हॉल आहे. जिथे वीकेंड का वारसाठी स्पर्धक बसलेले दिसतात.

घरातील किचनही आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलं आहे.

तर स्पर्धकांना बसण्यासाठी, जेवणासाठी खास डायनिंग एरियादेखील देण्यात आला आहे.

'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील बेडरुममध्ये खास थीम केल्याचं दिसत आहे.

तर यंदाच्या घरातही कॅप्टनसाठी वेगळी रुम असणार आहे. कॅप्टनसाठीची रुम खास पद्धतीने सजविण्यात आली आहे.

यंदाही घरात प्रशस्त गार्डन एरिया आहे. जिथे 'बिग बॉस मराठी'चे टास्क खेळले जातात.

जिथे घरातील सामान 'बिग बॉस'कडून दिलं जातं ती स्टोअर रुमही घरात आहे.

'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील कन्फेशन रुम जिथे बिग बॉस स्पर्धकांना काही खास गोष्टी सांगतात.

'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील यंदाचं बाथरुमही खास आहे.

'बिग बॉस मराठी ६'चं यंदाचं घर हे प्रेक्षकांना चकवा देणारं आहे. त्यामुळे आता घरात गेल्यानंतर स्पर्धकांची तारांबळ उडाल्याचं दिसणार आहे.