'बिग बॉस मराठी ६' गाजवणाऱ्या राकेश बापटची बहीणही दिसते सुंदर, धाकट्या भाचीवरही खिळल्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:33 IST2026-01-22T11:10:53+5:302026-01-22T11:33:30+5:30
राकेश बापट हे नाव सध्या मराठी टेलिव्हिजनविश्वात चर्चेत आहे.

राकेश बापट हे नाव मराठी आणि हिंदीतही परिचयाचं आहे. हँडसम हिरो म्हणून तो तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. राकेश सध्या बिग बॉस मराठी ६ मध्ये दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राकेश चर्चेत आला आहे. बिग बॉसमध्ये अनुश्री मानेने राकेशवर गंभीर आरोप लावला. राकेशने आपल्याला परवानगी नसताना हात धरुन खेचल्याचं अनुश्री म्हणाली.

या आरोपांमुळे राकेश चांगलाच भडकला कारण इंडस्ट्रीत त्याची जेंटलमन अशी प्रतिमा आहे. राकेशची काहीही चूक नसून इंडस्ट्रीतील अनेकांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

राकेशची मोठी बहीण शीतल बापटनेही पोस्ट केली. 'वुमन कार्ड खेळून गैरफायदा घेणाऱ्या महिलांमुळेच इतर महिलांबद्दलही तशीच धारणा होते' असं त्या म्हणाल्या.

शीतल बापटने याआधी हिंदी बिग बॉसवेळीही भावाला सपोर्ट केला होता. तेव्हा ती चर्चेत आली होती. राकेश दरवर्षी रक्षाबंधन, भाऊबीजेला बहिणीसोबतचा फोटो पोस्ट करतो. राकेशची बहीण नक्की काय करते माहितीये का?

शीतल बापट या पॅरेटिंग कोच आहेत. तसंच त्या करिअर मार्गदर्शकही आहेत. श्यामची आई फाउंडेशनही त्या चालवतात. वन्स अ पॅरेंट या त्यांच्या पेजवर त्या पालकांना मार्गदर्शन करतात.

शीतल बापट यांना ईशा आणि प्राची या दोन मुली आहेत. त्यातील प्राचीचं लग्न झालं असून ती अमेरिकेत राहते. तर ईशा एखाद्या अभिनेत्रीसारखीच दिसायला सुंदर आहे.

शीतल बापट यांना ईशा आणि प्राची या दोन मुली आहेत. प्राचीचं लग्न झालं असून ती अमेरिकेत राहते. तर ईशा एखाद्या अभिनेत्रीसारखीच दिसायला सुंदर आहे.

धाकटी भाची ईशा बापट ही राकेशला भेटायला बिग बॉस हिंदीमध्येही आली होती. ती गेट विल डन या कंपनीत काम करते. सौंदर्यात ती भल्याभल्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.

















