'अनुपमा'मध्ये मोठा ट्विस्ट, मालिकेत एक नाही तर होणार दोन घटस्फोट, तुटणार नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 21:04 IST2023-01-06T20:59:47+5:302023-01-06T21:04:23+5:30
Anupama : 'अनुपमा' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

'अनुपमा' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
अनुपमाच्या आगामी एपिसोडमध्ये मारामारी आणि वादानंतर चर्चा घटस्फोटापर्यंत पोहोचणार आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
अनुपमा आणि अनुज, काव्या आणि वनराज, तोशु आणि किंजलचं नातं तुटताना दिसतंय. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
काव्या वनराजवर नाराज आहे की तो त्याच्या कुटुंबाकडे जास्त लक्ष देतोय, काव्याला वाटतं की वनराजमुळे तिचं करिअर उद्धवस्त झालं. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
काव्या तिच्या माजी पतीला अनिरुद्धला फोन करते आणि दिल्लीतली नोकरीही स्वीकारते. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
आगामी भागांमध्ये अनु आणि अनुज वेगळे होताना दिसतील, अनुपमाने त्यांचे नाते सुधारण्यासाठी डेटची योजना आखली आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
अनुपमा फुलांनी घर सजवते, अनुज घरी परतला तेव्हा अनुजसोबत एक क्लायंट होता, आता पुढचा एपिसोड अधिक रंजक होणार आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
अनुपमा मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)