'भाभीजी घर पर है' मधील अभिनेत्याची मुलगी सौंदर्यात स्टारकिड्सना देते टक्कर; लवकरच करणार बॉलिवूड पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 08:33 IST2024-12-27T08:33:30+5:302024-12-27T08:33:56+5:30
'भाभाजी घर पर है'मधील अभिनेत्याची मुलगीही अभिनेत्री असून ती लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे

'भाभाजी घर पर है' मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील अभिनेते रोहिताश्व गौर यांची मुलगीही आता अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवणार आहे
'भाभाजी घर पर है' मालिकेत मनमोहनची भूमिका साकारणारे रोहिताश्व यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव गीती तर धाकटीचं नाव संजिती आहे
रोहिताश्व यांची मोठी मुलगी गीती आता बॉलिवूड पदार्पण करणार आहे. गीतीने लंडनमधील रॉयल अकॅडमी ऑफ आर्ट्समधून कोर्स पूर्ण केलाय