Ankita Lokhande : सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलल्याने अंकिता लोखंडे झाली होती ट्रोल; आता दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:49 PM2024-03-11T12:49:28+5:302024-03-11T13:40:18+5:30

Ankita Lokhande And Sushant Singh Rajput : अंकिता लोखंडे अनेकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसली.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉस 17 मध्ये दिसली होती. शोमध्ये अंकिता अनेकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसली. पण वारंवार सुशांतचा उल्लेख करत असल्याने अंकिताला खूप ट्रोल करण्यात आलं.

अभिनेत्रीच्या सासूबाई (रंजना जैन) या देखील म्हणाल्या होत्या की, अंकिता वारंवार सुशांतचं नाव घेऊन सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. आता अंकिता लोखंडेने यावर आपलं मौन सोडलं असून सडेतोड उत्तर दिलं आहे.

अंकिता लोखंडेने नुकतीच झूमला मुलाखत दिली. या संभाषणात अभिनेत्रीने सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना म्हटलं आहे की, तिला सुशांतबद्दल बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

अंकिता म्हणाली, "मला वाटतं की हे माझे आयुष्य आहे. जर मी एखाद्याला ओळखते आणि मला त्या व्यक्तीबद्दल काहीतरी चांगलं माहीत असेल तर मी त्याचा उल्लेख करेन. सुशांतचं नाव घेण्यापासून किंवा त्याचा उल्लेख करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही."

अभिनेत्री पुढे म्हणाली की हा तिचा स्वतःचा निर्णय आहे आणि भविष्यातही ती दिवंगत अभिनेत्याबद्दल बोलत राहील. तरी देखील लोक जर तिला जज करत असतील तर ती त्यांची मर्जी आहे.

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी जवळपास 8 वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. दोघेही त्यांचा पहिला शो पवित्र रिश्तामध्ये भेटले होते. या शोमध्ये काम करत असतानात ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

सुशांत आणि अंकिताने लग्नाचा निर्णयही घेतला होता. पण अचानक त्यांचं नातं लग्नाआधीच तुटलं. आजही अंकिताला सुशांतची आठवण येते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला.

'बिग बॉस'च्या घरात अंकिता ज्या व्यक्तीबाबत बोलल्यामुळे सर्वाधिक चर्चेत होती तो म्हणजे सुशांत सिंह राजपूत. या शोमध्ये अभिनेत्रीने एक्स बॉयफ्रेंड सुशांतबद्दल अनेकदा भाष्य केलं. स्वतःबद्दल आणि सुशांतबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.