"सुशांत खूप चांगला होता, आजही त्याच्या कुटुंबाशी आमचे..."; अंकिता लोखंडेच्या आईचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 06:07 PM2024-01-16T18:07:44+5:302024-01-16T18:18:42+5:30

Ankita lokhande : बिग बॉसमध्ये अंकिता नेहमीच तिच्या आणि सुशांतच्या नात्याबाबत बोलत असते.

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांचं नातं किती घट्ट होतं याची झलक आजही पाहायला मिळते. याच दरम्यान अंकिताची आई वंदना लोखंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बॉसमध्ये अंकिता नेहमीच तिच्या आणि सुशांतच्या नात्याबाबत बोलत असते. अंकिताची आई वंदना यांनी सांगितलं की, "अंकिता 7 वर्षे सुशांतसोबत राहत होती. अशा नात्यातून बाहेर पडणं कठीण आहे."

"दोघीही नियमितपणे बोलतात. एवढंच नाही तर सुशांतचे वडील देखील अंकिताशी संपर्क साधतात. ते तिला आपल्या मुलीप्रमाणे मानतात."

"अंकिताचा सुशांतच्या कुटुंबाशी ग्रेट बॉन्ड आहे. हे नातं इतकं घट्ट आहे की सुशांतच्या बहिणी राणी आणि श्वेता आजही तिला कॉल करतात."

सुशांतची आठवण काढून वंदना म्हणाल्या की, तो खूप चांगला मुलगा होता. अतिशय हुशार. अंकिता आणि सुशांत लिव्ह-इनमध्ये असताना मी त्यांच्यासोबत राहिले आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर विकीने अंकिताला खूप सपोर्ट केला आहे. जेव्हा अंकिताला खूप ट्रोल केल जात होतं तेव्हाही तिची साथ दिली असं आईने आपल्या जावयाबाबत म्हटलं आहे.

"विकीने अंकिताला प्रत्येक क्षणाला साथ दिली. आता बिग बॉसमध्ये काहीही दिसत असले तरी विकी तसा नाही, तो नेहमी अंकिताच्या सोबत असेल हे आम्हाला माहीत आहे."

"विकी हा नेहमी मला माझ्या मुलासारखा आहे. बिग बॉसमध्ये त्याला एका वेगळ्याच पद्धतीने दाखवलं जात आहे. तो अजिबात वाईट नाही. नेहमी साथ देतो" असं अंकिताच्या आईने म्हटलं आहे.

2023 मध्येच अंकिताला बिग बॉसची ऑफर मिळाली होती, पण तिच्या वडिलांच्या निधनामुळे ती सहभागी होऊ शकली नाही. अंकिता आणि विकी बिग बॉसमुळे सतत चर्चेत आहेत.