मराठी 'स्टारकिड'ची डेट नाईट! मराठी अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे अमेय नारकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:03 IST2025-12-29T11:51:08+5:302025-12-29T12:03:49+5:30

अभिनेत्रीने अमेयसोबतचे रोमँटिक डेट नाईटचे फोटो शेअर केले आहेत.

मराठीतील एव्हरग्रीन जोडी म्हणजे अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर. अनेक वर्षांपासून दोघंही मनोरंजनविश्वात काम करत आहेत. काही काळापासून ते टेलिव्हिजनवर सक्रिय आहेत.

अविनाश आणि ऐश्वर्या यांना अमेय हा मुलगा आहे. अमेय सध्या परदेशात आहे. त्याला दिग्दर्शनाची आवड आहे. परदेशात जाण्याआधी त्याने मराठीत काही नाटक, मराठी सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे.

अमेय नारकर एका मराठी अभिनेत्रीला काही वर्षांपासून डेट करतोय. कॉलेजमध्ये असल्यापासूनच दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली.

'लाखात एक आमचा दादा'मध्ये दिसलेली अभिनेत्री ईशा संजय अमेयची गर्लफ्रेंड आहे. नुकतेच ती अमेयसोबत डेटवर गेल्याचं दिसत आहे. त्याच्यासोबतचे रोमँटिक फोटो तिने शेअर केले आहेत.

ईशाने यावेळी काळ्या रंगाची साडी नेसली आहे. कानात सुंदर झुमके आहेत. ईशा अनेकदा साडी लूकमध्ये दिसते. होणाऱ्या सासूबाई ऐश्वर्या नारकर यांच्यासोबतही तिचा खास बाँड आहे.

तर अमेयने लाईनिंगचा व्हाईट शर्ट घातला आहे. यामध्ये तो एकदम हँडसम दिसत आहे.

ईशा आणि अमेय एकमेकांच्या डोळ्यात बघत मग्न झाले आहेत. त्यांच्या या रोमँटिक डिनर डेटचे फोटो चाहत्यांनाही भलतेच आवडले आहेत.

ईशाने या फोटोंना 'आरपार' असं कॅप्शन दिलं आहे. आपलं प्रेम कायम जिंकत राहील असंही लिहिलं आहे.