Aditi Sharma : ४ महिन्यांत लग्न मोडलं, अभिनेत्रीला रंगेहाथ पकडलं; पतीने केला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:27 IST2025-03-12T12:22:17+5:302025-03-12T12:27:41+5:30
Aditi Sharma And Abhineet Kaushik : अभिनीत कौशिकने अभिनेत्रीवर फसवणूकीचा गंभीर आरोप केला आहे.

टीव्ही अभिनेत्री आदिती शर्माच्या लव्ह लाईफची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ४ महिन्यांपूर्वी तिने गुपचूप लग्न केलं होतं पण आता ती घटस्फोट घेणार आहे.
पती अभिनीत कौशिकने अभिनेत्रीवर फसवणूकीचा गंभीर आरोप केला आहे. त्याने त्याच्या पत्नीला को-स्टार सामर्थ्य गुप्तासोबत पाहिलं होतं.
इंडिया फोरमशी झालेल्या चर्चेदरम्यान अभिनीतने पत्नीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल खुलासा केला. त्याने आदितीला रंगेहाथ कसं पकडलं ते सांगितलं.
अभिनीतला पहिल्यांदा ४ जानेवारी रोजी आदितीवर संशय आला. त्याच्या घरी एक पार्टी होती. तेव्हा त्याला एका व्यक्तीकडे अभिनेत्रीचा कल दिसला.
अभिनीतने आदितीला सामर्थ्यसोबत पाहिलं होतं. आदिती म्हणाली होती की, तिला डिनरला जायचं आहे, ती यासाठी नकार देऊ शकत नाही.
"जेव्हा आदितीने सांगितलं की ती पुन्हा शूटिंगला जात आहे तेव्हा हे सर्व लक्षात आलं. शूटिंग एक्सटेंड होत आहे. मला ही गोष्ट खोटी वाटली."
"आदितीच्या गाडीत जीपीएस बसवलेला होता. मी तिला ट्रॅक केलं. तिची गाडी एका सोसायटीच्या बेसमेंट उभी होती. मी रात्रभर तिथे आदितीची वाट पाहत होतो."
"मी सकाळी पाहिलं की आदिती आणि सामर्थ्य रेडी होऊन त्या अपार्टमेंटमधून बाहेर पडत होते. ते कुठेतरी जात होता. मी हे संपूर्ण दृश्य रेकॉर्ड केलं."
"जेव्हा मी माझ्या पत्नीला विचारलं की तिला सामर्थ्य आवडतो का? तेव्हा आदिती हसली. तिच्या वागण्याने मी गोंधळलो असं अभिनीतने म्हटलं आहे."
अभिनीत हा प्रोडक्ट डिझायनर आहे. २०२० मध्ये आदितीसोबत त्याचं अफेअर सुरू झालं. एका ऑनलाइन एक्टिंग क्लासमध्ये त्यांची ओळख झाली.
चार वर्षे त्यांचं अफेअर होतं. तो फक्त अदितीला भेटण्यासाठी मुंबईत आला होता. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांनी लग्न केलं.