"८० ऑडिशन्स दिल्या, मला कोणीही काम देत नव्हतं, सर्व जण..."; अभिनेत्री आता करतेय कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 14:48 IST2025-03-09T14:41:23+5:302025-03-09T14:48:22+5:30

अभिनेत्रीने सांगितलं की, ती स्वतःच्या मर्जीने अडीच वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिली नाही तर तिला काम मिळत नव्हतं.

अभिनेत्री सृष्टी माहेश्वरी सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदी टप्प्यात आहे कारण ती जवळजवळ अडीच वर्षांनी टीव्हीवर कमबॅक करणार आहे.

सृष्टी टीव्हीवरील लोकप्रिय शो 'कुमकुम भाग्य' मध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीने सांगितलं की, ती स्वतःच्या मर्जीने अडीच वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिली नाही तर तिला काम मिळत नव्हतं.

ईटाइम्सशी बोलताना, अभिनेत्रीने तिच्या कमबॅकबद्दल सांगितलं, "मी टीव्हीवर कमबॅक करत आहे. मी ब्रेक घेतला नाही, खरं तर मला कोणीही काम देत नव्हतं. सर्व जण बहाणे सांगत ​​होते."

"बरेच लोक मला म्हणायचे - तू आयुष्यात सेटल आहेस, तू आई झाली आहेस. तुला कामाची काय गरज आहे? मी फक्त २७ वर्षांची आहे, मग मी काम का करू नये?"

"पण दुर्दैवाने कास्टिंग डायरेक्टर मला मदत करत नव्हते. मी ७०-८० ऑडिशन्स दिल्या, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही."

"मी काम मिळण्याची वाट पाहत असताना, मी इंटर्नशिप केली आणि एका मित्रासोबत एका स्टार्ट-अपमध्ये सामील झाले."

"माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की, टीव्हीवर काम मिळेपर्यंत स्वतःला व्यस्त ठेव. म्हणून मी एका रिसायकलिंग कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून रुजू झाले."

"जेव्हा मला टीव्हीवर काम मिळत नव्हतं, तेव्हा मी ओटीटीवर काम केलं. एका हिंदी चित्रपटात काम केलं. वेब शो केले आणि अनेक जाहिरातीही केल्या."

"जर तुम्ही याकडे पाहिले तर मी न थांबता काम करत होते. अडीच वर्षांनी टीव्हीवर कमबॅक केल्यानंतर खूप आनंदी आहे."

"मला कुमकुम भाग्यमधील माझ्या भूमिकेबद्दल जास्त माहिती नाही, पण मी आनंदी आहे कारण मी ९ वर्षांनी एकता कपूरच्या प्रोडक्शनशी जोडली जात आहे" असं सृष्टीने म्हटलं आहे.