मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, रोमँटिक फोटोशूटने वेधलं लक्ष; पोस्ट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:55 IST2025-09-22T13:43:51+5:302025-09-22T13:55:31+5:30
लोकप्रिय मालिकेत करतेय काम, अरेंज मॅरेज करणार ही मराठी अभिनेत्री

गेल्या काही दिवसात अनेक मराठी सेलिब्रिटींनी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. काहींचा नुकताच साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्न करणार आहेत
कलर्स मराठीवरील 'अशोक मा.मा.' मालिकेत भैरवीच्या भूमिकेत दिसत असलेली अभिनेत्री रसिका वाखारकरचाही काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. आता ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
रसिकाने तिच्या एंगेजमेंटचे फोटो काही वेळापूर्वीच पोस्ट केले आहेत. रॉयल ब्लू रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
रसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शुभांकर उंबरानी आहे. ब्लॅक सूट बूटमध्ये तोही हँडसम दिसत आहे. त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
'इथेच आमच्या नवीन प्रवासाला सुरुवात होत आहे. engaged' असं कॅप्शन रसिकाने या फोटोंना दिलं आहे. अतिशय रॉयल अंदाजात त्यांनी हे फोटोशूट केलं आहे.
शुभांकर आणि रसिकाचं अरेंज मॅरेज आहे. शुभांकरचा कलाक्षेत्राशी काहीही संबंध नसून त्यांचा फॅमिली बिझनेस आहे. तर रसिका लग्नानंतरही अभिनयाचं करिअर सुरु ठेवणार असल्याचं म्हणाली.
रसिका वाखरकर याआधी 'पिरतीचा वणवा उरी पेटला' या मालिकेत दिसली होती. तसंच 'अथांग' या सीरिजमध्येही तिने भूमिका साकारली होती. सध्या अशोक मा.मा. मालिकेतून ती प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. यातील तिची आणि इंद्रनीलची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे.