बहिणीच्या निधनानंतर अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय; भाच्यांना सांभाळण्यासाठी राहिली अविवाहित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 10:50 IST2026-03-11T10:40:25+5:302026-03-11T10:50:46+5:30

अभिनेत्रीला ओळखलंत का? 'या' मालिकांमध्ये केलंय काम

'बालिका वध', 'क्राइम पेट्रोल', 'सावधान इंडिया','हप्पू सिंह की उल्टन पलटन' यांसारख्या मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री गीतांजली मिश्रा माहितीये?

गीतांजली मिश्रा आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करते. सध्या ती 'हप्पू सिंह की उल्टन पलटन' मालिकेत इन्सपेक्टर राजेश सिंह हे विनोदी पात्र साकारत आहे. मात्र गीतांजली निगेटिव्ह भूमिकांसाठीही ओळखली जाते.

३९ वर्षांची गीतांजली मिश्रा आजही सिंगल आहे. बहिणीच्या निधनानंतर तिने दोन्ही भाच्यांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. या कारणाने तिने स्वत: लग्नच केलं नाही. यामुळे तिच्या आईला अनेकांचे टोमणे ऐकावे लागले.

गीतांजली मूळची वाराणसीची आहे मात्र तिचा जन्म मुंबईतच झाला. लहानपणीच वडिलांचं निधन झाल्यानंतर आईने एकटीने लेकींचा सांभाळ केला. एका मुलाखतीत गीतांजली म्हणालेली की, "मी ५ वर्षांची होते तेव्हा आईसोबत मुंबईत आले. मुंबईत आईने दूध आणि भाजी विकून घर चालवलं.

माझी मोठी बहीण होती जिचं २०१७ मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. बहिणीला एक १४ वर्षांचा आणि एक ५ वर्षांचा मुलगा होता. त्यांच्याकडे बघणारं कोणीच नव्हतं. तसंच मला त्यांना दत्तक घेण्याची परवानही कायद्याने नव्हती.

तरी मी त्यांचा सांभाळ केला आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मला कदाचित चांगला नवरा मिळाला असता पण या मुलांना चांगला पिता मिळणार नाही, असं गीतांजली म्हणाली होती.

मी नंतर अभिनयात आले तेव्हा अनेकांनी माझ्या आईला टोमणे मारले. पण जेव्हा मी लोकप्रिय झाले तेव्हा तेच नातेवाईक आमच्या आजूबाजूला फिरु लागले.