"वजन कमी कर, तुझं नाक ठीक कर...", लोकांचा सल्ला ऐकून वैतागली अभिनेत्री; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:40 IST2025-01-22T12:26:16+5:302025-01-22T12:40:24+5:30
अभिनेत्रीने सांगितले तिला आलेले अनुभव

अभिनेत्री म्हटलं की त्यांनी टापटीपच राहिलं पाहिजे अशी अपेक्षा असते. तसंच त्यांची टोन्ड स्लीम बॉडी हवी, त्यांचे ओठ, नाक सगळंच नीट असावं तरच त्या हिरोईन मटेरिअल आहेत असं बोललं जातं.
ही अभिनेत्री आहे आयेशा खान(Ayesha Khan). बिग बॉस १७ मधून आयेशाला ओळख मिळाली. ती सध्या 'दिल को रफू कर ले' शोमध्ये दिसत आहे. याशिवाय ती काही म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे.
एका मुलाखतीत आयेशा म्हणाली, "लोक सतत तुम्हाला जज करत असतात. तू वजन कमी कर असंही मला सल्ला मिळाला आहे. एकदा तर मला नाक फिक्स कर असंही सांगितलं होतं. माझ्या नाकात प्रॉब्लेम आहे हे मला माहितच नव्हतं."
"इतकंच नाही मी एके ठिकाणी ऑडिशन दिलं होतं. त्यांना माझं ऑडिशन आवडलंही होतं. सगळं सुरळीत झालं. पण ते म्हणाले, 'सगळं ठीक आहे. ही एक हॉरर फिल्म आहे नाहीतर तुला तुझे दात नीट करावे लागले असते."
"मला धक्काच बसला आणि हसूही आलं. लोक किती जास्त जज करतात. आपल्याला आपल्याच शरीराबद्दल किती काय विचार करायला लावतात."
"सोशल मीडियावरही लोक लिहितात, 'अरे ही तर जाड झाली. हिचे हात बघा...कान बघा...लोकांना वाटतं अभिनेत्री आहे तर हिने परफेक्टच असलं पाहिजे."