थायलंडमध्ये एकटीच फिरतेय मराठी अभिनेत्री, बिकिनी लूकही केला फ्लॉन्ट; 'या' अभिनेत्याची बायको

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:37 IST2025-09-29T14:16:07+5:302025-09-29T14:37:09+5:30

आधी अमेरिके, मग इंग्लंड आणि आता थायलंडमध्ये पोहोचली मराठी अभिनेत्री, एकापेक्षा एक सुंदर Photos

मराठी अभिनेत्रींचे देश परदेशात फिरतानाचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. कित्येक अभिनेत्री वेगवेगळी ठिकाणं एक्स्प्लोर करत असतात आणि सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो शेअर करतात.

सध्या एका मराठी अभिनेत्रीच्या थायलंडमधील फोटोंनी लक्ष वेधून घेतलं. समोर सुंदर समुद्रकिनारा आणि क्युट आऊटफिटमध्ये अभिनेत्रीने फोटो शेअर केले आहेत.

ही आहे आयुषी भावे. आयुषी सध्या थायलंड येथील फुकेटमध्ये एन्जॉय करत आहे. पिवळ्या लाँग वनपीसमधील तिचे हे फोटो आकर्षक आहेत.

तसंच तिने फुकेट येथील एका आयर्लंडलाही भेट दिलेली दिसत आहे. तिथे तिने बिकिनी लूक फ्लॉन्ट केला आहे.

मोकळे केस, निळ्या रंगाची बिकिनी, ब्लॅक स्कार्फ आणि केसात फूल अशा लूकमध्ये तिने समुद्रकिनारी खास फोटोशूट केलं आहे.

आयुषी भावे काही महिन्यांपूर्वी अमेरिका, इंग्लंडमध्येही फिरत होती. तिथूनही बरेच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

आयुषी ही मराठी अभिनेता सुयश टिळकची पत्नी आहे. मात्र काही महिन्यांपासून दोघांमध्ये दुरावा आल्याची चर्चा आहे. दोघंही वर्षभरापासून सोबत दिसलेले नाहीत. तसंच सुयशने तो सिंगल असल्याचीही एक पोस्ट मधल्या काळात केली होती.

आयुषी शेवटची '१०:२९ आखिरी दस्तक'या हिंदी मालिकेत दिसली होती.'स्टार भारत'वर ही मालिका आली होती. यामध्ये तिची बिंदू ही भूमिका होती. आयुषीने 'रुपनगर के चीते' या मराठी सिनेमात काम केलं आहे.