PHOTO: साज ह्यो तुझा...! नऊवारी साडी अन् मोत्यांचे दागिने; मधुरा जोशीचा मराठमोळा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:36 IST2024-09-25T15:31:01+5:302024-09-25T15:36:34+5:30
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुरा जोशी.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली.
अभिनेत्रीने या मालिकेत 'इमली' नावाची व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
अभिनयाव्यतिरिक्त मधुरा तिच्या फॅशनसेन्समुळे देखील चर्चेत येत असते.
नुकतेच सोशल मीडियावर मधुराने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
नऊवारी साडी त्यावर साजेसे मोत्यांचे दागिने असा पेहराव करून तिने सुंदर असं फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीने नेसलेली नऊवारी साडी तिच्यावर कमालीची सुंदर दिसतेय.
मधुरा जोशीचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांच्या पंसतीस उतरले आहेत.