Photos : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मीनाक्षी राठोडची लेक तिच्याइतकीच आहे सुंदर, पाहा क्यूट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 08:00 IST2022-06-10T08:00:00+5:302022-06-10T08:00:07+5:30
Meenakshi Rathod : काही दिवसांपूर्वीच या मीनाक्षीनं मुलीच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता मुलीचे फोटो शेअर केले आहेत.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेतील देवकी अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड नुकतीच आई झाली. आता तिच्या लेकीचे फोटो समोर आले आहेत.
१० मे २०२२ रोजी मीनाक्षी आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना कन्यारत्न झाले. सध्या मीनाक्षी व कैलाश तान्ह्या लेकीचं कोडकौतुक करण्यात, तिच्या बाललीला पाहण्यात दंग आहेत.
काही दिवसांपूर्वीच या जोडप्यानं मुलीच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता मुलीचे फोटो दोघांनी शेअर केले आहेत.
मीनाक्षी व कैलाश यांनी लेकीचं पहिलं फोटोशूट करून घेतलं. या फोटोशूटचे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत.
मीनाक्षी व कैलाशची तान्हुली कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मीनाक्षीच्या युट्यूब चॅनलवर लेकीच्या पहिल्या फोटोशूटचा अख्खा व्हिडीओ शेअर केला गेला आणि यानंतर या फोटोशूटचे फोटो शेअर केलेत.
मीनाक्षीची लेक तिच्याइतकीच सुंदर आहे. फोटोशूट तर झक्कास आहे. पण चिमुकलीचे फोटोही तितकेच झक्कास आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत मीनाक्षीनं साकारलेली देवकीची भूमिका अल्पावधीत लोकप्रिय झाली.
काहीशी वेंधळी, मनानं तशी स्वच्छ पण कुणाच्याही सांगण्यावरून वाईट वागणारी देवकी तिनं अप्रतिम साकारली.
अगदी नवव्या महिन्यापर्यंत मीनाक्षी काम करत होती. सध्या मीनाक्षीने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. तिच्या जागी देवकी म्हणून भक्ती रत्नपारखी दिसत आहे.
2018 मध्ये मराठी मालिका ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मधून मीनाक्षीने टीव्ही विश्वात पदार्पण केलं.
मीनाक्षीचा पती कैलास वाघमारेने तान्हाजी: द अनसंग वारिअर, हाफ तिकीट, ड्राय डे अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो सुद्धा एक उत्तम अभिनेता आहे.