स्टार खेळाडूच्या बहिणीचा 'बिकिनी लूक' चर्चेत! Photos झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:47 PM2022-06-13T17:47:55+5:302022-06-13T18:03:24+5:30

इन्स्टाग्रामवर ती बोल्ड बिनधास्त फोटोस कायम पोस्ट करत असते

Star Player Sister Hot Bikini Photos RAFAELLA SANTOS: फुटबॉलपटू किंवा क्रिकेटर्स आपल्या शरीरावर टॅटू काढतात हे आपण सामान्यत: बघतो. आपल्या आयुष्यातील एखादी खास आठवण हे खेळाडू आपल्या शरीरावर टॅटूच्या रुपात काढतात.

अनेक स्टार खेळाडूंच्या अंगावर तर संपूर्ण शरिरभर टॅटू आहेत. टॅटू काढण्याची आवड केवळ पाश्चात्त्य देशातील लोकांनाच नव्हे तर आशियाई देशांतील लोकांनाही आहे.

अनेक प्रसिद्ध खेळाडू आपल्या शरिरावर वेगवेगळे टॅटू काढताना दिसतात. पण एका दिग्गज खेळाडूची बहिण टॅटूच्या बाबतीत इतर खेळाडूंपेक्षाही दोन पावलं पुढे असल्याचे दिसतंय.

ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार याची बहिण राफेला हिने तर आपल्या शरीरावर अनेक टॅटू काढले आहेत. सोशल मीडियावर तिचा बिकीनी लूकमधील फोटो चांगलाच चर्चेत आहे.

बिकीनी लूकमधील राफेलाच्या फोटोत तिच्या शरीरावरील टॅटू स्पष्टपणे दिसत आहेत. तिने आपले अनेक बोल्ड आणि बिनधास्त अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

राफेला जे फोटोज शेअर केले आहेत, त्यात ती फिटनेसबाबतही जागरूक असल्याचे दिसत आहे. २६ वर्षीय राफेलाचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत.

ती आपल्या बोल्ड लूक आणि टॅटूमुळे कायमच चर्चेत असते. तिने आपल्या हातावर भावाच्या डोळ्यांचा टॅटू काढला आहे. त्या टॅटूला अनेकांची पसंती मिळाली आहे.

नेमारची बहिण स्टाईल आयकॉन आहे. त्यासोबतच ती मॉडेलदेखील आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ५.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

सर्व फोटोंसाठी सौजन्य- राफेला सांतोस Instagram page