सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचे आरोप ते जयललिता यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसाठी अर्ज, कोण आहे विशाल रेड्डी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 06:34 PM2023-09-29T18:34:22+5:302023-09-29T18:51:42+5:30

सेन्सॉर बोर्डावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केल्यामुळे विशाल चर्चेत आला आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. सेन्सॉर बोर्डातील (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन)अधिकाऱ्यांनी चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यासाठी ६.५ लाख रुपयांची लाच घेतलाच्या गंभीर आरोप विशालने केला आहे.

याबाबत त्याने एक ट्वीटही केलं आहे. या ट्वीटमध्ये 'मार्क एंटनी' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सर्टिफिकेट देण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने पैसे उकळल्याचं त्याने म्हटलं होतं. सेन्सॉर बोर्डावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केल्यामुळे विशाल चर्चेत आला आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया.

विशाल हा अभिनेता असण्याबरोबर निर्माता आणि दिग्दर्शकही आहे. त्याने अनेक तमिळ चित्रपटांत काम केलं आहे. एक्शन चित्रपटांसाठी तो खासकरुन ओळखला जातो. त्याचं संपूर्ण नाव विशाल कृष्णा रेड्डी असं आहे.

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून विशालने त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर २००४ साली रोमँटिक थ्रिलर असलेल्या 'चेलामे' सिनेमातून त्याने अभिनयात पदार्पण केलं. त्याने अनेक सिनेमांची निर्मितीही केली आहे.

विशालचे वडील जी.के.रेड्डी हे एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. त्यांनीदेखील अनेक तेलुगु आणि तमिळ चित्रपटांची निर्मिती केली आहे. विशालचा भाऊ विक्रम कृष्णा हा देखील अभिनेता आणि निर्माता आहे.

विशालने बालकलाकार म्हणूनही काम केलं आहे. 'सत्यम', 'वेदी', 'समर', 'थिमिरू', 'पुजाई', 'आंबाला' अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केलं आहे. बहुतांश चित्रपटात तो पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता.

जयललिता यांच्या निधनानंतर २०१७ साली चेन्नईतील त्यांच्या राधाकृष्णननगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी विशालने उमेदवारी अर्जही दाखल केला होता. परंतु, काही कारणांमुळे त्याचा हा अर्ज फेटाळण्यात आला होता.

विशालचे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर मोदी सरकार एक्शन मोडमध्ये आलं आहे. या प्रकरणाबाबत चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असं माहिती आणि प्रसारण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. या संदर्भात एक ट्वीटही करण्यात आलं आहे.