तमिळ सुपरस्टार विशालच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 16:37 IST2025-08-31T16:27:34+5:302025-08-31T16:37:47+5:30
तमिळ सुपरस्टार विशालने १२ वर्ष लहान अभिनेत्री सईसोबत साखरपुडा केला आहे.

तमिळ सुपरस्टार विशाल (Tamil Actor Vishal ) गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे.
विशालने अखेर त्याच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला.
विशालने आपल्या साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत
विशालने पारंपरिक पोशाख घातला असून त्याच्या होणाऱ्या पत्नीनं सुंदर साडी नेसली आहे.
त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहते आणि सहकलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विशालच्या होणाऱ्या पत्नीचं नाव सई धनशिका असं आहे. विशाल आणि सई धनशिका गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत.
दोघेही खूप चांगले मित्र आहेत. या वर्षी मे महिन्यात एका कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती.
सई धनशिकाने अनेक तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पण रजनीकांत यांच्या 'कबाली' या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे तिला जगभरात ओळख मिळाली. या चित्रपटात तिने रजनीकांतच्या मुलीची भूमिका साकारली होती.
विशालची होणारी पत्नी त्याच्यापेक्षा तब्बल १२ वर्षांनी लहान आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हणतात. सई आणि विशालच्या साखरपुड्यामुळे हे सिद्ध झालं आहे.